Tuesday, July 30, 2013

जगा लेकोमीटिंग मधे फोन वर
एक  भिजलेला श्वास
कोणाला ऐकू नाही गेला
कारण mute वर ठेवले होते  पत्ठ्यास

परत फिरून
लक्ष देणे भाग होते
पण प्रयत्न करून करून
मन वेडावले होते

फोन वर
किती संभाषणे साधली
पण भुकेलेल्या मनाची
तहान नाही भागली

वाटल .. ह्यातल्या प्रत्येकाला सांगावे
करा disconnect अन बिनधास्त सुट्टी घ्या
deadlines आणि goals .. कशाचीही चिंता करता
लेकांनो तुम्ही एक दिवस स्वतासाठी जगा

जा घरी आणि मिठी मारा बायकोला
उठलून घ्या चिमुकल्यांना
किवा पहा एक मस्त picture
आणि मग ताणून द्या छान दुपारभर

मस्त फिरायला जा बागे मध्ये
किवा hike करा डोंगरावर
हो ... त्याच डोंगरावर .. जो पाहून
उसासे सोडता तुम्ही दिवस भर

उद्या नाही आजच करा, नंतर नको आत्ताच जगा
उद्या office असणारच आहे हो , तुह्मी लेको जगा किवा मराNo comments:

Post a Comment