Monday, December 21, 2015

जादुगार

प्रिय आई ,

मला अस वाटत आई आणि मुलीने नेहमीच जवळ रहाव
मला अस वाटत आई आणि मुलीने नेहमीच जवळ रहाव
दिवसभर असते मी मुलांची आई
काही क्षण का होईना मी रोज फक्त माझ्या आईच मुल व्हाव ...

आई, मग तुला तहान लागली कि मी पाणी आणून द्याव
ते हि तू न सांगता
मग एक फक्कड चहा करावा फक्त तुझ्या आणि तुझ्या साठीच
दुध जराही न सांडता

आणि मग मात्र मी आळशी माणसा सारख
सोफ्यावर बसून रहाव मस्त
कारण मी कस वागायचं तुझ्याशी ह्याचे नियम
मीच बनवते ना फक्त

आई, मग मी TV बघत असताना
"आ …… ई भू …क " म्हणायच्या आधीच तू प्रकट व्हावस
हातातली तांदुळाची भाकरी भरवून
तू प्रेमाने बघावास

तहान लागलीये म्हणायच्या आधीच
पाणी समोर याव
अशी किमया फक्त तुलाच येते आई
कुणी जादूच्या प्रयोगांना कशाला जाव


मी तुझ्याकडे कोकम च सरबत मागताना
तू माझ्या वर्षातून एकदा बनवलेल्या चहाच कौतुक करावस
रात्री जेवणात हे करू का ते करू विचारताना
मी हे पण कर आणि ते पण कर म्हंटल्यावर तू हळूच हसावस

मुलगी बनता बनता मी मग
आई बनायला शिकते
आणि आई बनता बनता
माझ्यातल्या मुलीला बिलगून राहते

माझ्या डोळ्यातलं confusion मग
तुलाच अचूक कळत
एका छान मिठीमध्ये मग
एक गुपित उलगडत …