Thursday, October 18, 2012

TP Queen

काय करतोस जय?
काय करतोस जय?
अग TP करतो थोडा
सारखे काम करून करून
कंटाळा आला जरा
 
Huh , TP ?
TP  म्हणजे काय?
अग TP म्हणजे time  pass
माहित नाही कसे तुला?
 
TP म्हणजे काय
हे कोणी रे सांगितले तुला?
अग काल दुपारी गप्पा मारताना
आज्जीच म्हणाली मला
 
बघ TP करणे सोप्पे नाही
हे माहित आहे का तुला?
जरा disturb करू नकोस
मोकळे सोड बघू मला
 
Hello Daddy Hello Daddy
जरा वेळ आहे का तुला?
TP म्हणजे काय करावे
ते सुचत नाहीये मला
 
हो का?असे करू?
बर बर, phone ठेवतो मी आत्ता
संद्याकाळी तू घरी आल्यावर
सावकाश मारूया गप्पा
 
अग mummy अग mummy
एक meeting घायची आहे मला
daddy म्हणाले कि तू TP expert आहेस
म्हणून consult  करतो तुला
 

No comments:

Post a Comment