Monday, March 18, 2013

खेळ

काही सांगायचे होते
अन स्वताचेच गुपित ऐकायचे होते
सांगता सांगता आपल्याच मिठीन कोसळून
ऐकता ऐकता हलकेच डोळे पुसायचे होते

काही विसरायचे होते
अन काही आठवायचे होते
विसरता-आठवता हळूच स्वताला हरवायचे होते

काही सांभाळायचे होते
अन काही गमवायचे होते
बंद मुठी उघडून
उधळून सगळे लावायचे होते

खेळ मांडायचे होते
अन मग विसकटून टाकायचे होते
बिखरलेले सावरताना मग
परत स्वताला शोधायचे होते


No comments:

Post a Comment