Thursday, June 28, 2012

Kadhi Kadhi

विराट अचाट अशा या जगात
कसे जखडलो काळाच्या पाशात

सकाळ संध्याकाळ अन मग रात्रीचा मेळ
पुन्हा पुन्हा तोच खेळ

मन मागे आपण पुढे
मन इथे तर आपण तिथे

कुणाला एंक बाबा कुणाला एंक आई
कुणाला दोघेही अन कुणाला कुणीच नाही

प्रश्न किती पण उत्तरे नाहीत
गावेसे वाटले तर सूर जुळत नाही

कोण मित्र अन कोण नाही
शेवटी आपण एकटेच का तेही कळत नाही

कुठली सुरुवात आणि कुठला शेवट
पाहता पाहता वाट गेली सरत

No comments:

Post a Comment