Monday, May 14, 2012

Prem

भर दुपारची वेळ
आणि घरातले प्रेम संपत आलेले
आणावे मागून कुणा कडून
अडचणीच्या काळाची आत्ताच ठेवावी तरतूद करून

मिळेल कि प्रेम
साखर नाही का मिळत
फार तर काय होईल
लोक म्हणतील वेडी आहे, हिला कसे काहीच नाही कळत

रणरणत्या उन्हात निघाले तशीच
पायात चपला
डोक्यावर टोपी
थोडेतरी प्रेम मिळेलच ह्या खुशीत

समोरच्या घरी जावे
तिथे नक्कीच मिळेल
उगीच नाही गळ्यात गले असतात त्य्नाचे
प्रेम कसे ओसंडून वाहत असेल

हात तिथेच थबकला
दारावरची बेल वाजवताना
ती जोर जोरात रडत होती
आणि तो सुन्न पणे बसला होता
आज भांडणानंतर कोणाचाच मूड उरला नव्हता

बघा म्हणजे
घरोघरी मातीच्याच चुली
जिथे आशेने जावे
तिथेच कशी होते मी हिरमुसली

शेजारी जावून पाहावे
माहित नाही प्रेम मिळेल का
दमलेली बायको आणि त्रासलेला नवरा
कदाचित दोघा मुलांकडे थोडा लोभ असेल उरला

खिडकीजवळ पाय थबकले
समोरचे दृश्य बघून
दोघे आरामात दिसावली होती
आपल्या चिमण्यांना कुशीत घेउन

दमलेले चेहरे
थकलेला श्वास
हळूच पकडलेले हात
आणि चेहऱ्यावर समाधानाची बरसात

परत फिरले
आणि तो दिसला
तीच भेदक नजर
आणि तोच आत्मविश्वास चेहऱ्यावर

म्हणालाअग वेडे, प्रेम शोधत होतीस तर
एकदा घरी तरी नीट बघायचे
दारी तुझ्या कल्पवृक्ष
आणि उगाच दुसरी कडे  कशाला शोधायचे

धावले त्याच्याकडे
आणि कडकडून मारली मिठी
म्हणाले - अरे कुठून आली एव्हढी समज तुझ्याकडे
अन इतकी मिठास वाणी

माफ कर मला
मी एंक सामान्य माणूस
नाही बघितला दारातला प्राजक्ताचा सडा
आणि नाहीच कळले आपले माणूस

No comments:

Post a Comment