Friday, August 3, 2012

Mohini

तिचा विचार केला कि
त्याचे एकदम भान हरपते
तिला मात्र काहीच पत्ता नाही
ती आपले तिचेच काहीतरी करत असते

तो हातातले काम टाकून
तिच्यामागे पळतो
रात्रीवर रात्री
तिच्याच विचारात काढतो

कधी कधी त्याला वाटते
ती कशी एकदम साधी आहे
एक हात जरा पुढे केला कि
तिची माझ्याशीच गट्टी आहे

पण मग कधी कधी
ती फार खडुसगिरी करते
काहीही कारण नसताना
अशीच उगाच अडून बसते

ती हसते, आणि म्हणते
अरे वेड्या, मी नाही खरी, मी तर एक मोहिनी
तरी म्हणाले होते तुला
Resources वाढव आणि time allocate करू नकोस कमी
----------------------------------------------------------------------------
Here is to all your future releases Datta..Cheers and happy project planning!!
-From the Un-Mohini in your life

No comments:

Post a Comment