Wednesday, September 19, 2012

Bappa

गंपती बाप्पा, गोड मानून घ्या आमचे लाडू
mummy आणि daddy ला बुद्धी द्या जेव्हा आम्ही हात जोडू
 
तसे ठीक आहेत रे ते
आमच्या काही complaints नाहीत
कधी कधी भांडतात थोडे
and thats alright
 
एक सांगू बाप्पा
तुझ्या उंदरासारखा एक उंदीर पाठवशील का रे मला?
दोन नको, एकच पुरे
नाहीतर mummy म्हणेल किती मागशील रे मुला
 
का पाहिजे ते सागतो तुला, दे इकडे तुझा कान
Lego पाहिजे तेव्हा store मध्ये जायला आहे कुठे वाहन?
आता कोण वाट बघणार weekend ची, week केवढा मोठा
आणि Amazon वर shopping करायला मी पडलो छोटा
 
आणि हा, while you are at it
थोडी chocolates पण sanction कर कि आमच्यासाठी
तू पाहिजे तेव्हा लाडू खावेस
मग हे rules का बरे आमच्यासाठी?
 
बाकी सगळे छान चाललाय रे, एक homework सोडला तर
माहीतच आहे ना तुला
but its okay, I will text about that
आता school ला जायचेय रे मला
 
-Jay
 
 

1 comment: